अश्लील विज्ञापन फलकाच्या विरोधातील ‘रणरागिणी’च्या चळवळीला यश
म्हापसा, २५ सप्टेंबर (वार्ता.) - ‘रणरागिणी’ गट आणि महिला संघटना यांनी अश्लील विज्ञापन फलकाच्या विरोधात छेडलेल्या राज्यव्यापी चळवळीला आता यश येऊ लागले आहे. बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी श्री. दशरथ रेडकर यांनी काल म्हापसा नगरपालिकेचे अधिकारी आणि म्हापसा पोलीस यांची वरील विषयाला
फलकाला पांढरा रंग कोणी फासला हे कळू शकलेले नसले, तरी संबंधित विज्ञापन फलक लावणार्याने हा रंग फासला असण्याची शक्यता शासकीय अधिकार्यांकडून व्यक्त केली जात आहे. उपजिल्हाधिकारी श्री. दशरथ रेडकर यांनी परवा झालेल्या बैठकीत अश्लील विज्ञापन फलक प्रदर्शित करणार्यांना संपर्क साधून त्यांना हा फलक हटवण्यासंबंधी सूचना करण्याचे आदेश पालिका आणि पोलीस अधिकारी यांना दिला होता.
या बैठकीनंतर या फलकावरील अश्लीलता झाकण्यासाठी फलकाला पांढरा रंग लावण्यात आला आहे; मात्र फलकावरील चित्र केवळ अस्पष्ट झालेले असले, तरी छायाचित्रावरील अश्लीलता अजूनही दृष्टीस पडत आहे. (लोकहो, जाहिरात दिसेनाशी होईपर्यंत रंग लावावा, यासाठी पाठपुरावा करा, तरच चळवळीचा उद्देश सफल होईल ! - संपादक) तसेच म्हापसा परिसरात अजूनही अश्लीलता दर्शवणारे फलक असून, यासंबंधी काहीही कारवाई झालेली नाही. ‘रणरागिणी’ आणि महिला संघटना यांनी नवरात्रांरभ म्हणजे २८ सप्टेंबरपूर्वी अश्लील विज्ञापन फलक हटवण्याची मागणी उपजिल्हाधिकारी श्री. रेडकर, म्हापसा नगरपालिका यांच्याकडे यापूर्वी केली असून, अन्यथा आंदोलन छेडण्याची चेतावणी दिली आहे.
अश्लील जाहिरातफलक हटवण्यासाठी कृतीशील असलेले उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांच्यासारखे अधिकारी असल्यास हिंदुराष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही !
हिंदूंनो, या यशासाठी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा ! तसेच गोव्यात इतरत्रही असलेले अश्लील फलक हटवले जाईपर्यंत ही चळवळ चालूच ठेवा !