मुंबई - ‘टू जी स्पेक्ट्रम’मध्ये जो १ लक्ष ७६ सहस्त्र कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला, त्या संदर्भात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर दूरसंचारमंत्री ए. राजा कारागृहात गेले.
आणखी चौकशी झाल्यावर लक्षात आले की, ‘टू जी स्पेक्ट्रम’च्या परवानावाटपाचा निर्णय एकट्या दूरसंचार खात्याने घेतलेला नाही, तर अर्थ खाते आणि दूरसंचार खाते यांनी एकत्रितपणे घेतला आहे. त्या वेळी दूरसंचारमंत्रीपदी ए. राजा, तर अर्थमंत्रीपदी पी. चिदंबरम होते.दोघांच्या या निर्णयावर सह्या आहेत. जर राजा दोषी असतील, तर चिदंबरम यांनाही सहआरोपी म्हणून अटक करून कारागृहात पाठवायला पाहिजे, असे प्रतिपादन जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नुकतेच मुंबईत केले. ते ‘हिंदुस्थान समाचार’ या भारतीय भाषिक वृत्तसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी आसाम राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. अशोक साहू, सारस्वत बँकेचे संचालक श्री. एकनाथ ठाकूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. गोविंदाचार्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. स्वामी पुढे म्हणाले, ‘‘ते कारागृहात जाणारच आहेत; कारण मला सर्वोच्च न्यायालयाने सरकारी वकील म्हणून बोलण्याची अनुमती दिली आहे. १५ सप्टेंबरला मी न्यायालयात मागणी करणार आहे की, चिदंबरम यांना सहआरोपी घोषित करण्यात यावे. या घोटाळ्यात देशाची १ लक्ष ७६ सहस्त्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. यात ३ सहस्त्र कोटी रुपये ए. राजा, ५ सहस्त्र कोटी रुपये पी. चिदंबरम, १८ सहस्त्र कोटी रुपये करुणानिधी आणि ३६ सहस्त्र कोटी रुपये सोनिया गांधी यांना देण्यात आले आहेत. हा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी हवालाच्या मार्गाने विदेशातील बँकेत नेऊन ठेवला आहे. हवालामार्गे पैसे नेण्याचे काम पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. करते. त्यामुळे तिला कुठल्या कुठल्या भारतियांचे पैसे कोणकोणत्या बँकेत आहेत, ते माहीत असते. विदेशी बँकेत ठेवलेला काळा पैसा नंतर धनादेश, डिमांड ड्राफ्ट वा रोकड अशा स्वरूपात अमेरिकेतील एका बँकेत नेला जातो.
तेथे एक ‘पार्टीसिपेट्री नोट’ मिळते. ही ‘पार्टीसिपेट्री नोट’ केवळ भारतियांनाच दिली जाते. तिच्यावर नाव नसते. केवळ जमा केलेली रक्कम लिहिलेली असते. अशाच प्रकारे सोनिया गांधींनी केतन पारीख यांना १७ सहस्त्र कोटी रुपये ‘पार्टीसिपेट्री नोट’साठी दिले होते. ती ‘नोट’ भारतात आणल्यावर शेअरबाजारामध्ये शेअर विक्रेत्यांना आणि भारतीय रिझर्व्ह अधिकोषात दाखवण्यात येते. त्या ‘नोट’द्वारे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेअरची खरेदी-विक्री होते. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक एकदम वर जातो. भारतात शेअर बाजारमधील निर्देशांक अर्थशास्त्रानुसार नव्हे, तर काळ्या धनामुळे खाली-वर होतो. अन्य देशांत असे होत नाही. भारतात या गोष्टीतून भ्रष्ट लोक अधिक पैसे कमावतात. तो पैसा काळ्याचा पांढरा झालेला असतो. या प्रकरणाची सेबी किंवा अन्य कुठलीही अन्वेषण यंत्रणा चौकशी करू शकत नाही; कारण तसा कायदाच केलेला आहे. तो पैसा पुन्हा जमीन-मालमत्ता खरेदीमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे आपल्याकडे जागेचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. परिणामी देशाची अर्थव्यवस्था आणि अर्थकारण पूर्णपणे बदलून गेले आहे.’’
डॉ. स्वामी पुढे म्हणाले, ‘‘असा पैसा परदेशातून भारतात आणतांना त्यावर २५ प्रतिशत कर द्यावा लागतो. त्यावर सोनिया गांधी यांनी चिदंबरम यांना उपाय काढण्यास सांगितला. त्यानुसार मॉरीशस देश लहान असल्यामुळे तेथून भारतात गुंतवणूक करणार्यांवर कर १ प्रतिशत ठेवला आहे. तेथे एखाद्या आस्थापनाची नोंदणी करण्यासाठी १ डॉलर लागतो.
त्यामुळे सध्या भ्रष्टाचारी मोठ्या प्रमाणावर मॉरीशसमधून भारतात गुंतवणूक करत आहेत. ती अमेरिकेच्याही चारपट एवढी आहे. ‘टू जी स्पेक्ट्रम’मधील बरीच आस्थापने मॉरीशसमधून आलेली आहेत. कुख्यात आंतरराष्ट्रीय तस्कर दाऊद इब्राहीमचा उजवा हात समजल्या जाणार्या डी.बी. रियालिटीच्या शाहीद बलवानेही मॉरीशसच्या एका आस्थापनाला ‘टू जी स्पेट्रम’चा परवाना आठपट अधिक रकमेने विकला होता. आपल्या देशात बाहेरील आस्थापनाला दूरसंचारचे परवाने देऊ नयेत, कारण देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, अशी सूचना गृह मंत्रालयाने दिली होती; मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करून ‘युनीनॉर’ या परदेशी आस्थापनाला परवाना देण्यात आला. या प्रकरणाची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. सोनिया गांधी विदेशात गेल्या आहेत. त्या आता लवकर येतील, असे वाटत नाही.’’ या कार्यक्रमाची सांगता ‘वन्दे मातरम्’ने झाली.