'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

म्हणे, महापालिकेत गणेशोत्सवासह धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा करू नका !

काही तथाकथित पुरोगामी संघटनांनी 
गेल्या वर्षी दिलेल्या निवेदनाच्या आधारे सांगली महापालिकेचा ‘फतवा’ !

सांगली, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - गेल्या वर्षी काही विघ्नसंतोषी तथाकथित पुरोगामी संघटनांच्या वतीने शासकीय कार्यालयांमध्ये गणेशोत्सव किंवा अन्य कोणताही उत्सव, धार्मिक कार्यक्रम किंवा सत्यनारायणाच्या पूजेसारख्या पूजाअर्चा करू नयेत, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले होते.
या निवेदनाचा आधार घेत येथील सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील शासकीय अधिकार्‍यांनी ‘या निवेदनावर कार्यवाही करावी’, अशा आशयाचा फतवा काढून हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. 
( हिंदूंच्या सणांच्या संदर्भात असा आदेश काढणारे मंत्रालयात मुसलमानांना नमाज पढण्यासाठी दिलेल्या खोलीसंदर्भात काय करणार आहेत ? आज केवळ हिंदू असंघटित असल्यानेच कुणाच्यातरी कधीच्यातरी निवेदनाच्या आधारे हिंदूंच्या धर्मभावनांवर आघात केले जातात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदुसंघटन हाच एकमेव उपाय आहे ! - संपादक ) 
त्यामुळे महापालिकेतील भाविक मंडळींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. ( हिंदूंनो, वांझोटा संताप व्यक्त करत राहू नका. हिंदुद्रोही परिस्थिती पालटण्यासाठी सनदशीर मार्गाने कृतीशील व्हा ! - संपादक ) गेल्या वर्षी काही खोडसाळ तथाकथित पुरोगामी राजकीय पक्ष आणि जनसंघटना यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्यामध्ये म्हटले होते, ‘शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्या आवारातील सर्व धर्मांची छायाचित्रे, धर्मस्थळे काढावीत. भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक २८(१) नुसार पूर्णतः राज्याच्या निधीतून चालवल्या जाणार्‍या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. हा कायदा आहे. गणेशोत्सवासह अनेक धार्मिक विधी शाळांमध्ये साजरे करून इतर धर्माच्या मुलांच्या भावना दुखावल्या जातात. 
(हिंदूंनी त्यांचा उत्सव साजरा केल्याने इतर धर्मांच्या मुलांच्या भावना दुखावल्या जाण्याचे काय कारण ? त्यांना हिंदु धर्म आपला वाटत नाही का ? नसेल, तर या हिंदुबहुल राष्ट्रात ते रहातात तरी कशाला ? असे लोक देशाच्या एकात्मतेस बाधा आणणारे आहेत. त्यांनी खुशाल स्वधर्मियांच्या देशात चालते व्हावे ! - संपादक) बळजबरीने त्यांच्यावर त्यांची इच्छा नसलेली पूजाअर्चा करण्याचे बंधन घातले जाते. (आजवर एकाही शाळेतील अन्य पंथियांकडून याविषयी तक्रार आलेली नसतांना फुकाचा कांगावा करणार्‍या पुरोगामी संघटना ! - संपादक) 
बर्‍याच शासकीय कार्यालयांत सत्यनारायणाची पूजा केली जाते. हे सर्व संविधानाच्या कोणत्या नियमात बसते, याचे अन्वेषण करावे. भारतीय संविधान कलम क्रमांक २५ नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माचे आचरण, प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार देण्यात आला असून ही बाब खाजगी आणि वैयक्तिक आहे. त्यामुळे यापुढे असे करणार्‍यांवर कडक कारवाई करावी.’ हे निवेदन कार्यवाहीसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांकडे आल्यावर त्याला दुसरे पत्र जोडून ‘या निवेदनावर कार्यवाही व्हावी’, अशा आशयाचे पत्र महापालिकेच्या शासकीय अधिकार्‍यांनी सर्व खातेप्रमुखांना पाठवले आहे. 
(हिंदूंनो, आज शासकीय शाळा, महाविद्यालये, कार्यालये यांत पूजाअर्चा करण्यावर आणि उत्सव साजरे करण्यावर बंदी आणणारे प्रशासन उद्या रस्ते, मैदाने, उद्याने आदी सार्वजनिक ठिकाणीही उत्सव साजरे करण्यावर बंदी आणील. हिंदु धर्माच्या अस्तित्वावर घाला घालणारे असले नियम करणारे प्रशासन पालटण्यासाठी हिंदुराष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! - संपादक)  या पत्राच्या विरोधात असंतोष पसरला असून प्रतीवर्षीप्रमाणे महापालिकेत यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi