ठाणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने घेण्यात येणारी ‘गणेश दर्शन स्पर्धा’ यंदा २१ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. यंदा ही स्पर्धा ३ आणि ४ सप्टेंबर या दिवशी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आमदार श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. प्रथम मंडळास २५ सहस्त्र आणि विशेष गुणवत्तापूर्ण आकर्षक श्री गणेशमूर्तीसाठी २ लक्ष रुपयांपर्यंत पारितोषिके देण्यात येणार आहेत. कल्याण शहरातील मेळ्याच्या गणपतीसाठी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.