'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

श्री गणेशाच्या स्वागतासाठी महापालिका यंत्रणा सज्ज - आयुक्त

मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - श्री गणेशाचे आगमन आणि विसर्जन यांसाठी पालिकेने संपूर्ण यंत्रणा तैनात केली आहे. या उत्सवासाठी पालिकेकडून १ सहस्त्र  ५५४ कर्मचारी आणि २५८ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटी यांसारख्या विसर्जनस्थळी मोठी यंत्रणा सिद्ध ठेवण्यात आली आहे. चौपाटीच्या वाळूतून श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेणे सुलभ व्हावे, यासाठी २३१ ‘स्टील प्लेट’ लावण्यात येत आहेत. तसेच यंदा विभागीय स्तरावर २२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi