'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

धर्मशिक्षण : श्री गणेश विशेष

कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करण्याचे महत्त्व
     इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय पूजास्थानी कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करतात. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती देवता तेथे येऊ शकते. यालाच महाद्वारपूजन किंवा महागणपतिपूजन असे म्हणतात.
नादभाषा आणि प्रकाशभाषा यांचे एकमेकांत रूपांतर करणारा : मनुष्याची नादभाषा असते, तर देवतांची प्रकाशभाषा. गणपति ही नादाचे प्रकाशात आणि प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे; म्हणून आपण बोलतो ती नादभाषा गणपति समजू शकतो; म्हणूनच तो लवकर प्रसन्न होणारा देव आहे. इतर देवता बहुतांशी प्रकाशभाषाच समजू शकतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गणपति’)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi