'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘वीर शिवाजी’ मालिकेचे नाव ‘छत्रपती शिवाजी’ करण्याची हिंदु जनजागृती समितीची ‘कलर्स’ वाहिनीला विनंती !

मुंबई, ३१ ऑगस्ट - ‘कलर्स’ या वाहिनीवर मंगळवारपासून चालू होणार्‍या ‘वीर शिवाजी’ या मालिकेचे नाव पालटून ‘छत्रपती शिवाजी’ असे करावे, अशी विनंती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कलर्स’ या वाहिनीच्या व्यवस्थापकांना करण्यात आली आहे.

याविषयी दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे, ‘आपण या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे उदात्तीकरण करून या आपत्काळात सर्वांना प्रेरणा देत आहात, ही गोष्ट कौतुकास्पद अशीच आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘वीर शिवाजी’ असा उल्लेख झाल्यास सर्वसामान्यही त्यांना एकेरी नावाने संबोधतील. त्यामुळे त्यांचा अनादर होऊन जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज हे सार्‍या महाराष्ट्राचे दैवत आहे आणि त्यांचा सर्वांना अभिमानही आहे. तरी आपण आपल्या मालिकेचे नाव पालटून ‘छत्रपती शिवाजी’ असे करावे.’
वरील निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सीमित सरमळकर, धर्मशक्ती सेनेचे श्री. नरेंद्र सुर्वे, ‘राजे शिवाजी प्रसारक मंडळा’चे श्री. विजय खिल्लारे आणि श्री. विश्वनाथ सावंत हे उपस्थित होते. ‘कलर्स’ वाहिनीचे उपव्यवस्थापक धनंजय दौंड यांनी हे निवेदन स्वीकारले आणि ‘‘वरिष्ठ अधिकार्‍यांशी या संदर्भात चर्चा करू’’, असे सांगितले.


या संदर्भात धर्माभिमानी पुढील पत्त्यावर संपर्क करून वाहिनीला विनंती करत आहेत.
संपर्क : (०२२) ४२३२५३००, 
फॅक्स : (०२२) ६७६५२६६३/४
पत्ता : व्हायाकॉम १८ मिडिया प्रायव्हेट लिमिटेड, ३०, एच्, सिमरन सेंटर, ३ रा मजला, पारसी पंचायत रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, ४०००७२.
संगणकीय पत्ता : colorstv@viacom18.com
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi