मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंत्रालयातील मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, सामाजिक न्यायविभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, विधी आणि न्याय विभागाचे सचिव श्री. व्ही.एल्. अंचलिया,
श्री. राजेंद्र भागवत अन् गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. उमेशचंद्र सरंगी या उच्चपदस्थ अधिकार्यांना प्रस्तावित (अंध)श्रद्धाविरोधी कायद्याच्या विरोधात निवेदन सादर करण्यात आले.जुन्या कायद्याच्या विधेयकाइतकेच सध्याचे विधेयक घातक असल्याने या कायद्याला संमती देण्यात येऊ नये. शासनाला हा कायदा करायचाच असेल, तर कायदेतज्ञांची आणि समाजसेवकांची मते जाणून घेऊन त्रुटीरहित कायदा आणावा, त्यासाठी काही सूचना आणि सुधारणा या पत्रासमवेत दिल्या आहेत. या वेळी श्री. दिनेश वाघमारे यांनी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ‘समिती आणि वारकरी यांच्याकडून आलेल्या सूचनांचाही विचार केला जाईल. या सूचना आणि सुधारणा कायदाविषयक अभ्यास समितीकडे अन् आवश्यकतेनुसार ‘नॅशनल लॉ कमिशन’कडे पडताळण्यासाठी पाठवू’, असे त्यांनी सांगितले.