श्री. नित्यानंद भिसे
मुंबई, ३१ जुलै - सध्या चालू असलेल्या महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनावर सवालक्ष गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याच्या मागणीचे पडसाद उमटले आहेत. बहुतांश विरोधी पक्ष प्रथमच एका विषयावर एकत्र आल्यामुळे दोन्ही सभागृहांत सत्ताधार्यांवर दबाव पडला.
दोन दिवस प्रदीर्घ चर्चा झाल्यावर काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून या मागणीवर सकारात्मक उत्तराची अपेक्षा करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी सवालक्ष गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणे अशक्य असल्याचे सांगितले.मुंबई, ३१ जुलै - सध्या चालू असलेल्या महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनावर सवालक्ष गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याच्या मागणीचे पडसाद उमटले आहेत. बहुतांश विरोधी पक्ष प्रथमच एका विषयावर एकत्र आल्यामुळे दोन्ही सभागृहांत सत्ताधार्यांवर दबाव पडला.
यंदाच्या अधिवेशनात बंद गिरण्या चालू करण्याचा निर्णय होणार नाही. निदान गिरणी कामगारांच्या डोक्यावर छत तरी मिळेल, त्यांना मोफत घरे मिळतील, अशी अपेक्षा होती; दोन्ही काँग्रेसने ती अमान्य केली. केवळ काँग्रेसच्या अनास्थेमुळे गिरणी कामगारांच्या राजकारणाचे आता रौप्य महोत्सव साजरे करावे लागणार आहे. खिस्ताब्द १९८१ पासून गिरणी कामगार देशोधडीला लागला आहे.
या गिरणी कामगारांचा देश आणि राज्य यांच्या उभारणीत सिंहाचा वाटा आहे. लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आली, तेव्हा त्यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी याच गिरणी कामगारांनी संप केला होता. त्यामुळे ब्रिटिश राजवटीला माघार घ्यावी लागली होती. स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांपैकी ९५ हुतात्मे गिरणी कामगार होते. त्यामुळे महाराष्ट्रात मुंबईचा समावेश झाला.

गिरणी कामगारांच्या घरांच्या मागणीवर दोन्ही सभागृहात चर्चा रंगली, तेव्हा विधानसभेत चर्चेच्या वेळी लोकप्रतिनिधींनी ‘गिरणी कामगार’ हा विनोदाचा विषय केला. भाषणांच्या प्रारंभी बहुतांश सदस्य ‘आपण कोणत्या गिरणी कामगाराचे नातलग आहोत’, याचेच विश्लेषण करून विनोद करत होते, तर विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही ठिकाणच्या सदस्यांनी गिरणी कामगारांचा विषय बाजूला ठेवून एकमेकांची राजकीय उणीधुणी काढण्यात सभागृहाचा चार तास वेळ वाया घालवला. या आधी दोन्ही सभागृहांतील सदस्यांनी संपूर्ण एक दिवस दोन्ही सभागृह बंद पाडले.
विधानसभेत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी एक तास भाषण केले. त्यातही विरोधकांवर टीका आणि विनोदनिर्मितीचा भाग अधिक होता. एकूणच विधीमंडळातील दोन्ही सभागृहांत जनतेच्या विषयावर चर्चा अल्प; परंतु राजकारण आणि मनोरंजन अधिक होत असल्याचे दिसून आले.