'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

कायद्याच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारणार ! - अशोक सिंघल

प्रस्तावित हिंदुद्रोही 
‘सांप्रदायिक आणि लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक अधिनियम २०११’ कायद्याचे प्रकरण

मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) - काँग्रेस शासन आणि सोनिया गांधी यांना सत्ता वाचवण्यासाठी मुसलमान अन् खिस्ती यांचे तुष्टीकरण करायचे आहे. त्यासाठी ते हिंदु संतमहंत, धर्मगुरू आणि हिंदू यांना कारागृहात टाकण्यासाठी ‘सांप्रदायिक अन् लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक अधिनियम २०११’ हा काळा कायदा संसदेत संमतीसाठी आणणार आहेत.
हिंदूंवर अन्याय करणार्‍या या प्रस्तावित कायद्याच्या विरोधात विश्व हिंदु परिषद, संतमहंत, धर्मगुरू आणि हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. अशोक सिंघल यांनी काल येथे दिली.
श्री. सिंघल पुढे म्हणाले, ‘‘केवळ हिंदूंवर अत्याचार आणि अन्याय करणारा हा कायदा असून तो मुसलमान आणि खिस्ती यांना संरक्षण देणारा आहे. या कायद्याद्वारे काँग्रेस शासन हिंदूंना कारागृहात टाकील. खिस्त्यांचे लांगूलचालन करणार्‍या सोनिया गांधी या कायद्याचा हिंदूंवर दडपशाही करण्यासाठी वापर करतील. मुसलमान आणि खिस्ती यांच्याकडून हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर केले जात असतांना हा कायदा करून शासन मुसलमान अन् खिस्ती यांना अभय देत आहे.
हिंदूंचे जगणे या कायद्यामुळे कठीण होणार आहे. हा कायदा देशाच्या राज्यघटनेला छेद देणारा आहे, तसेच हा कायदा म्हणजे हिंदूंच्या विरोधात पुकारलेले युद्ध असेल. हा कायदा बनवणारे तिस्ता सेटलवाड अन् अन्य लोक हे हिंदुविरोधी आहेत. सोनिया गांधी या व्हॅटीकनच्या पोपचा ‘अजेंडा’ भारतात राबवून हिंदुविरोधी कायदे करून हिंदूंचे धर्मांतर घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. 
हा कायदा संमत झाला, तर देशातील ८२ टक्के लोकसंख्या असलेल्या हिंदूंवर मोठा आघात होईल. खोटे खटले हिंदूंवर भरले जातील. अराजक आणि आतंकवाद माजेल. काँग्रेस शासन आधीच हिंदु संतमहंत आणि धर्मगुरू यांच्यावर अत्याचार करून त्यांना अपमानित करत आहे. आतातर या कायद्याने हिंदूंना चिरडण्यासाठी आयते कोलीतच त्याच्या हाती पडणार आहे. 
या कायद्यामुळे देशात आणीबाणीची स्थिती निर्माण होईल. ओरिसातील बिजू जनता दल आणि डावे यांच्या राज्यशासनाने अन् तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही या कायद्याला विरोध केला आहे. देशभरात या कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन उभारण्याची दिशा संत आणि धर्मगुरू ठरवतील. त्याप्रमाणे मोठे आंदोलन हिंदु संघटना उभारतील अन् कायद्याला तीव्र विरोध करतील.’’ या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष श्री. देवकीनंदन सिंघल आणि विहिंपचे श्री. उमेश राणे हे उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi