'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

एस्.एस्.आर्.एफ्.च्या ऑगस्ट २०११ च्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या साधकांची वैशिष्ट्ये

जगभरात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या (स्पिरियुअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या) आजपासून चालू होणार्‍या कार्यशाळेसाठी प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी विदेशातून १२ साधक गोवा राज्यातील  रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. हे साधक मागील काही महिने ते फारतर १ ते २ वर्षेच साधनेत आहेत. ते साधनेत नवीन असतांनाही चांगले प्रयत्न करत आहेत. या साधकांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे देत आहे.

१. दृष्टीकोन पुष्कळ चांगले असणे
    कमी कालावधीसाठी साधना करूनही त्यांचे दृष्टीकोन पुष्कळ चांगले आहेत. उदा. एका विदेशी साधकाला आश्रमातील एका साधकाने एक सूत्र सुचवले. तेव्हा त्याने ते मान्य केले नाही. नंतर त्याच्या लक्षात आले की, देवाने त्या साधकाच्या माध्यमातून मला सुचवले आहे आणि मी ते मान्य केले नाही. याची त्याला पुष्कळ खंत वाटली. त्या विदेशी साधकाला साधनेत येऊन केवळ चारच महिने झाले आहेत, तरीही त्याने हा दृष्टीकोन आणि भाव ठेवला.

२. श्रीकृष्णाशी संवाद साधू शकणे आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असणे
    साधनेच्या एवढ्या कमी कालावधीतच ते श्रीकृष्णाप्रती भाव ठेवत आहेत आणि त्याच्याशी  आत्मनिवेदनातून संवाद साधू लागले आहेत. खरेतर ते सर्व हिंदू नसून बहुसंख्य परधर्मीय आहेत. तसेच त्यांचा प.पू. डॉक्टरांप्रतीही पुष्कळ भाव आहे. ते प.पू. डॉक्टरांना प्रत्यक्ष प्रथमच पहात आहेत. सामान्य व्यक्तीत असा भक्तीभाव इतक्या लवकर निर्माण होत नाही. याचा अर्थ ते जन्मतःच साधक आहेत, हे लक्षात येते.

३. साधकत्व असणे
    त्यांची लक्षात आलेली आणखी काही वैशिष्ट्ये म्हणजे ते सेवेसाठी सतत तत्पर असतात आणि सांगितलेली गोष्ट लगेच आचरणात आणतात. तसेच सांगितलेल्या किंवा लक्षात आलेल्या चुकाही लगेच मान्य करतात आणि स्वतःला सुधारण्यासाठीचेही प्रयत्न करतात. याचबरोबर त्यांच्यात वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, तळमळ आणि शिकण्याची वृत्ती हेही गुण आहेत.

४. सूक्ष्मातीलही कळणे
    त्यांना सूक्ष्मातीलही थोड्याफार प्रमाणात कळते.  देवाने त्यांच्यामधे साधकत्वाचे बीज आधीच रोवलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर साधनेचे विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत.
    हे श्रीकृष्णा, या विदेशातील साधकांमध्ये जे गुण आहेत, ते आमच्यातही येऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना.
- कु. प्रियांका जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi