'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

दिल्लीत महिलांचा ‘बेशर्मी मोर्चा’

धर्मद्रोही काँग्रेवाल्यांमुळे भारताचे वेगाने होत असलेले नैतिक अधःपतन !

नवी दिल्ली, ३१ जुलै - रविवारी सकाळी १०.३० वाजता दिल्लीत महिला आणि पुरुष यांनी महिलांवर दिल्ली शहरात होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात ‘बेशर्मी मोर्चा’ काढला. या मोर्चात सहभागी महिलांनी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कपडे परिधान करण्याची आणि वागण्याची मुभा हवी, असे म्हटले आहे.

(इच्छेप्रमाणे वागण्याची मुभा देणे म्हणजे अराजकाला आमंत्रण होय ! महिलांनी त्यांना हवे आहेत, तसे कपडे त्यांच्या घरी घालावेत. समाजात जर रहायचे आहे, तर समाजाचे नियम पाळावेच लागतील. तसेच आज महिलांवर अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे, याचे कारण म्हणजे समाजाला धर्मशिक्षण नसल्याने तो धर्मपालन करत नाही. निधर्मी राज्यकर्त्यांनी हिंदूंचे सक्तीने पाश्चात्तीकरण चालवल्यामुळे ते भोगवादीच बनत आहेत. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आणि महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देऊन सबल बनवणे, हाच खरा उपाय आहे. सनातन संस्थेने अनेक महिला आणि मुली यांना स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून सबल बनवले आहे, ज्यांनी त्यांना छेडणार्‍या सडक सख्याहरींना वेळप्रसंगी चोप देऊन स्वतःचे रणरागिणीचे रूप दाखवून दिले आहे. - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi