मुंबई, ३१ जुलै - नॉर्वेचा सामूहिक संहारकर्ता आणि तथाकथित आयर्न्द्स बेहरिंग ब्रेविक (वय वर्षे ३२) याने काही दिवसांपूर्वी ओस्लो नगरीत बाँबस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार करून ७६ निरपराध लोकांना ठार मारले असले आणि त्या घटनेचा निर्विवाद निषेध करणे अवश्य असले,
तरी त्याने प्रसिद्ध केलेल्या प्रदीर्घ घोषणापत्राचा अभ्यास करून भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ऐकावयास उत्सुक असलेल्या जागतिक वाचकवर्गासमोर मुसलमान, खिस्ती आणि कम्युनिस्ट यांच्याविषयीची आपली भूमिका संशयातीत स्पष्टपणे मांडण्याची सुवर्णसंधी सोडू नये, असे आवाहन हिंदू मानवाधिकार मंचाने केले आहे.मंचाची कार्यकारिणी बैठक श्री. रवी नाथानी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी २७ जुलै या दिवशी उत्कर्ष मंडळ येथे झाली. या बैठकीला सर्वश्री मकरंद महाडिक, सत्यप्रकाश मिश्र आणि अरविंद कुळकर्णी प्रभृती सदस्य उपस्थित होते. वर्तमानपत्रातून उपलब्ध झालेल्या ब्रेविक यांच्या घोषणापत्रातील मुद्यांचा विचार या बैठकीत करण्यात आला.
ते मुद्दे असे आहेत : साम्यवादी संस्कृतीचा विलय करण्यासाठी ब्रेविक यांना जागतिक युद्ध छेडायचे आहे.
त्यासाठी ते जी संघटना बांधू इच्छित आहेत तिचे नाव जस्टीशिया नाईट्स (justicia knights ) असे असणार आहे. मार्क्सवादी युरोपात जसे राष्ट्रवाद्यांचा छळ करीत आहेत, तसे भारतात ते हिंदू राष्ट्रवाद्यांना छळत आहेत, असे म्हटले आहे. कम्युनिस्टांना हिंदु संस्कृती पूर्णपणे नष्ट करायची आहे; म्हणून भारतातल्या आणि युरोपमधल्या कम्युनिस्ट विचाराच्या विरोधात असलेल्या संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
इसवी सन १००० ते १५२५ या काळात लक्षावधी हिंदूंची कत्तल करण्यात आली आहे, असे म्हणून या घोषणापत्रात भारतातून सर्व मुसलमानांना हाकलवून देण्यासाठी यादवी युद्ध झाले, तर आपली संघटना त्यात हिंदूंच्या बाजूने भाग घेईल, असे ब्रेविक यांनी म्हटले आहे. भारतीय भूमीवर इस्लामचे अस्तित्व असता कामा नये, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. सध्या भारतात जे राज्य करीत आहेत ते खिस्ती धर्मप्रसाराला उत्तेजन देत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
हिंदू मानवाधिकार मंचाने ब्रेविक यांच्या घोषणापत्राविषयी पुढील मत व्यक्त केले आहे : कम्युनिस्ट, मुसलमान आणि खिस्ती यांचे समर्थक आणि मार्गदर्शक हिंदुहिताविषयी तुच्छता दाखवून आणि हिंदूंचे या देशावरील प्रभुत्व पुसून त्या ठिकाणी आपापल्या विचाराचे प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे नि स्वतंत्रपणे विधिनिषेधशून्य कारस्थाने करीत असले तरी त्यांचे हेतू विफल करण्यासाठी ब्रेविक यांचे घोषणापत्र उपदेशिते ते मार्ग अवलंबिण्याची आवश्यकता नाही. संहार व्हावा किंवा यादवी युद्ध करावे अशी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही.
हिंदुत्वानिष्ट संघटनांना हवे ते परिवर्तन प्रबोधनाने होऊ शकेल. येथील कम्युनिस्ट, मुसलमान आणि खिस्ती हे मूळचे हिंदु आहेत. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता हे उदात्त विचार हिंदूंनी जगाला दिले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणापेक्षा भारतातील कम्युनिस्ट, मुसलमान आणि खिस्ती वेगळे असून त्यांच्यातील जाणीवपूर्वक गाडलेले उदात्त हिंदु विचार पुन्हा जागे करावे लागतील. त्याकरिता हिंदूंना हिंदी राष्ट्रवादाचा त्याग करून हिंदु राष्ट्रवादाचा अंगीकार कारावा लागेल. हिंदू हिंदु झाले तरच ते उदात्त हिंदु विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी होतील. हिंदू हिंदु झाले तरच ते इस्लामी आतंकवाद, घातक खिस्ती धर्मप्रसार आणि मार्क्सवाद्यांचे बुद्धिभ्रम करून विघटन करण्याचे कारस्थान या तिहेरी संकटांवर निर्णायक मात करू शकतील.
हिंदुत्व हे लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, सहिष्णू आणि जागतिक शांततेला प्राणभूत ठरणारे तत्त्वज्ञान आहे हे जगाला पटवून देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रबोधनाचा झंजावात करावा, असे आवाहन मंचाने केले आहे. बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांनी त्यांच्या देशात हिंदूंवर होणार्या अत्याचारांना आपल्या लेखनातून वाचा फोडण्याचा जो उपक्रम केला त्याकरिता त्यांना त्यांच्या देशातून परागंदा व्हावे लागले, भारत सरकारने त्यांना आश्रय दिला नाही आणि त्यांच्या लेखनविषयाची जागतिक प्रसारमाध्यमांनी न्यायबुद्धीने दखल घेतली नाही, याकडे लक्ष वेधून मंचाने अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळण्याचा विश्वास देणे हा अराजक टाळण्याचा एक मार्ग असू शकतो, असे सूचित केले आहे.