हुबळी (कर्नाटक) - येथील सदाशिवनगरातील एक हिंदु महिला एकटीच असल्याचे पाहून संदीप एम्. आणि आयझॅक या दोन खिस्ती धर्मप्रसारकांनी घरात प्रवेश केला. त्यांना येशूच्या प्रार्थनेचे महत्त्व सांगू लागले. ‘येशूला प्रार्थना केल्यास सर्व व्याधी, अडचणी आदी दूर होतात’ असे सांगून त्यांनी महिलेला धर्मांतर करण्याचा आग्रह केला. (हिंदूंनो, खिस्त्यांचा कुटील डाव ओळखा. येथून पुढे अशा धर्मप्रसारकांना घरात घ्यायचे नाही, असा निर्धार केला, तरच तुमचे हिंदुत्व अबाधित राहील, हे सत्य जाणा ! - संपादक) ही गोष्ट
तेथील काही जागृत हिंदूंच्या लक्षात आली. त्यांनी लगेचच त्या दोघांना तेथील विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांकडे सोपवले. (जागृत हिंदूंना पोलिसांपेक्षा विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांचा अधिक आधार वाटतो, हे पोलिसांच्या हिंदूंच्या संदर्भातील असंवेदनशीलतेचे फलित ! - संपादक) त्यांनी या दोघांना पोलिसांच्या कह्यात दिले. या वेळी त्या दोघांकडे असणारी खिस्ती पंथाच्या प्रसाराची पत्रके जप्त करण्यात आली. पोलीस ठाण्यात गेल्यावर मात्र या दोघांनी ‘आमच्यावर आक्रमण करण्यात आले’, अशी तक्रार दिली. दैनिक ‘पुढारी’ने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. (यावरून खिस्त्यांचा उद्दामपणा स्पष्ट होतो. - संपादक)
