'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

डोंबिवली येथे सनातन संस्था रायगड न्यासाच्या वतीने योग शिबिराचे आयोजन

योग शिबिराचे प्रात्यक्षिक दाखवतांना सौ. अमृता संभूस  
डोंबिवली, ३० जून (वार्ता.) - सनातन संस्था रायगड न्यासाच्या वतीने नुकतेच येथील साधक श्री. कार्तिक साळुंखे यांच्या निवासस्थानी महिलांसाठी विनामूल्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा २५ पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला. या वेळी न्यासाच्या सौ. अमृता संभूस आणि सौ. प्रतिमा परब यांनी उपस्थित महिलांना योगासने, प्राणायाम यांची तात्त्विक माहिती दिली अन् प्रात्यक्षिकेही करून घेतली. या वेळी श्री. साळुंखे यांच्या इमारतीतील अन्य रहिवाशांनीही ‘न्यासाचा हा उपक्रम चांगला आहे’, अशी प्रतिक्रिया दिली.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi