शाळा म्हटले की, शिस्त हा प्रकार आपसूक आलाच. शाळेतील शिस्तीचा सर्वाधिक प्रभाव विद्यार्थ्यांवर असतो, असे म्हणणे अयोग्य नाही. भावी पिढीवर आदर्श नागरिकत्वाचे अन् मनुष्यत्वाचे संस्कार करायचे असतील,
तर शाळांत शिस्तप्रियता असणे अत्यावश्यक आहे. शाळांमध्ये शिस्त नसेल, तर विद्यार्थी टवाळ अन् असंस्कृत होतात. शाळकरी मुलांमध्ये उपजतच द्वाडपणा असतो. ती मस्तीखोर असतात. त्यांना शिस्तीत बांधून ठेवणे मोठ्यांना आवश्यक वाटते.
तसा ते प्रयत्नही करतात; पण शिस्तीचे कुंपण जितके मोठे तितके ते मोडण्याची मुलांची उर्मीही प्रबळ होते. शालेय शिक्षकांना याचा नेहमीच प्रत्यय येत असतो. पूर्वाचे मास्तर ‘छडी लागे छम छम' म्हणत मुलांकडून विद्या घोटवून घेत. आताचे शिक्षक मस्तीखोर, शिस्त नसलेल्या मुलांना शिक्षा करण्यापूर्वी त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्यासमोर मुलांच्या वर्तनाचा पाढा वाचतात आणि पालकांनी त्यांंच्यावर लक्ष ठेवण्याची अपेक्षा बाळगतात. यातूनही एखाद्या पालकाने निष्काळजीपणा दाखवला आणि त्याच्या मुलाचा मस्तीखोरपणा उपद्रवकारक ठरू लागला, तर मुलाचे नाव शाळेतून काढून टाकण्याचे पाऊल उचलले जाते. तो अपवाद असतो, नियम नव्हे. अर्थात अलीकडे काही शाळा विद्यार्थ्यांवरील शिस्तीच्या बडग्याचा अतिरेक करतांना दिसत आहेत. याविषयी सांगोपांग चर्चा होणे आवश्यक आहे.
बेशिस्तीला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांकडून न्यायदंडाधिकार्यांचे चांगल्या वर्तनाचे हमीपत्र मागणारी शाळा !
अंधेरीच्या एका शाळेने विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी एक अचाट आणि आचरट पाऊल उचलले आहे. मरोळ येथील ‘प्राइम अकॅडमी’ या शाळेने इयत्ता ९ अन् १० वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना त्यांनी न्यायदंडाधिकार्यांंकडून आपल्या चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणणे बंधनकारक केले आहे. जो विद्यार्थी ते सादर करणार नाही, त्यास पुढील सत्रात वर्गात बसू दिले जाणार नाही, असे शाळेच्या संचालकांनी घोषित वâेले आहे. संस्थाचालकांच्या या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थी अन् पालक यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जी मुले गेली अनेक वर्षे याच शाळेत आहेत, त्यांच्या वर्तनाची वेगळी खात्री (हमी), तीसुद्धा न्यायदंडाधिकार्यांंकडून मागणे, कितपत योग्य ? अशा प्रकारे हमीपत्र घेऊन बेशिस्त विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई वâेली जाईल आणि एखाद वेळेस आक्षेपार्ह वर्तन करणार्या विद्यार्थ्यास अटकही केली जाईल. शाळेच्या चालकांनी मुलांच्या बेशिस्तीची केस न कापणे, दांडगाई करणे ही उदाहरणे दिली आहेत. आजकाल मुलांच्यातील बेशिस्त वाढली आहे, हे मान्य; परंतु त्यावरील उपाययोजना म्हणून असे टोकाचे पाऊल उचलणे योग्य आहे का ? यात सर्व दोष मुलांचाच आहे कि विद्यमान शिक्षणव्यवस्थाही याला उत्तरदायी आहे ? मुलांचे वय घडणीचे असते आणि ते जगातील अनेक चांगल्या-वाईट गोष्टी पाहून त्यांचा आपल्यापरीने अर्थ लावतांना भरकटू शकतात. अशा वेळी त्यांना समजून घेण्याची, त्यांच्या चुकांची त्यांना कठोरपणे जाणीव करून देण्याची आवश्यकता असते. विद्यामंदिरांचे व्यापारीकरण झाल्यानेच अशा अतिरेकी घटना घडतात, असे या घटनेवरून म्हणावे लागते.
धर्माधिष्ठित राज्यकर्ते हवेत !
सध्याची शिक्षणव्यवस्था आणि अभ्यासक्रम हा मेकॉलेच्या कारकून निर्माण करण्याच्या पठडीतला आहे. इंग्रजांच्या पूर्वी भारतात गुरुकुल पद्धत होती. त्यात गुरूंकडे राहून विद्यार्थी शिक्षण घेत असत. येथे त्यांचे जीवन आदर्श कसे होईल, याचे शिक्षण देण्यात येत असे. आताची शिक्षण पद्धती पोटापाण्याची व्यवस्था करण्याची आहे आणि शिक्षक व्यवसाय म्हणून त्यांच्या कर्तव्याकडे पहात आहेत. मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी शिक्षक, अभ्यासक्रम आणि सामाजिक स्थिती याचाही विचार करावा लागतो. शाळेत काही घंटे घालवणारे विद्यार्थी दिवसातील अनेक घंटे घरी असतात. तेथे दूरचित्रवाहिन्यांवरील आचरट, संस्कारहीन आणि अश्लील कार्यक्रमांचे संस्कार त्यांच्या मनावर होत असतात. त्याचा परिणाम शाळेत दिसून येतो. त्यावर वरील प्रमाणे उपाय काढणे हेही चुकीचे आहे. मुलांमध्ये शिस्त रूजवण्यासाठी शिक्षक, अभ्यासक्रम आणि सामाजिक स्थितीत पालट घडवणे हा त्यावरील योग्य उपाय ठरणार आहे. ते होण्यासाठी राज्यकर्ते धर्मनिष्ठ असते आवश्यक आहे. ते सध्या नसल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा धर्माधिष्ठित राज्यकर्ते आणून विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक घडवण्यासाठी पालकांनी साधना करून संघटित होणे आवश्यक ठरते.
