'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

बाळासाहेब ठाकरे यांनी समाजासाठी काय केले ? - अजित पवार

नगर, ३१ मे - बाळासाहेब ठाकरे यांनी समाजाच्या विकासासाठी आतापर्यंत काय केले ? ना त्यांनी शिक्षणसंस्था काढल्या, ना कारखाने उभारले. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केले.
याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकर्‍यांच्या विकासासाठी साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था उभारल्या. बाळासाहेब मुंबईत आपल्या घरात बसून नवनव्या घोषणा करतात, आणाभाका घेतात.
समाजासाठी ठाकरेंचे योगदान काय, असा थेट प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर जिल्ह्यातील अकोले येथे जाहीर कार्यक्रमात बोलतांना केला. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही या वेळी अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. अलिकडेच राहुरी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कृषी विकासाविषयी नाराजी व्यक्त करतांना नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्याचे गोडवे गायले होते. त्याचा संदर्भ घेऊन केवळ आपल्या सहकार्‍यांची उणीदुणी काढून महाराष्ट्राची उन्नती होणार नाही. दुसर्‍यांचे गुणगाण करून राज्याचा विकास होत नाही, अशी टीका अजित पवार यांनी या वेळी केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi