राज्यकर्त्यांनी जनतेला पिळून काढून केवळ स्वार्थ साधल्याने जनतेला उबग आला आणि त्याचे पर्यवसान उद्रेकाच्या स्फोटात झाले, सगळा भारत एकत्र येऊन अण्णांच्या मागे भारतवासी उभे आहेत; पण हे पाताळयंत्री राज्यकर्ते अण्णांना कुठे फसवतील, याचा नेम नाही !
‘राज्यकर्त्यांनी जनतेला पिळून काढले आणि केवळ स्वार्थ साधला. अशी एकही गोष्ट शेष ठेवली नाही की, जिथे भ्रष्टाचार झाला नाही. भ्रष्टाचारही थोडाथोडका नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात अब्जावधी रुपयांचा. शिक्षण, अन्न, वैद्यकीय अशा महत्त्वाच्या क्षेत्रांतही भ्रष्टाचार होतो, हे खरंच आश्चर्य आहे. या मंत्र्यांना त्याचे सोयरसुतक नाही, इतके हे निर्लज्ज अन् अप्रामाणिक झाले आहेत.महागाईने कळस गाठला आहे. या सगळ्याचा जनतेला उबग आला. त्याचे पर्यवसान उद्रेकाच्या स्फोटात झाले. सगळा भारत एकत्र आला, हे होणे अटळ होते. जनतेची सहनशीलता संपलेली होती. तिचा कडेलोट झाला होता. त्याचाच हा परिणाम होता. अण्णा हजारे यांच्या मागे भारतवासी उभे आहेत. अण्णा हजारे यांनी सावध पावले टाकली पाहिजेत. हे राज्यकर्ते अण्णांना कुठे फसवतील, अडकवतील, याचा थांगपत्तासुद्धा अण्णांना लागणार नाही. सगळे राज्यकर्ते, मंत्रीगण पाताळयंत्री आहेत. त्यात सरळ स्वभावाच्या अण्णांना आणि त्यांच्या सहकार्यांना हे मंत्री जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील.’
(श्रीगजानन आशिष, मे २०११) लोकपाल विधेयक मसुदा समितीतील पाताळयंत्री केंद्रीय मंत्र्यांनी काल न्यायपालिका, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री यांना कक्षेबाहेर ठेवण्याची मागणी रेटली, हा याच षड्यंत्राचा परिणाम आहे, तेव्हा अण्णा हजारे, सावध व्हा ! - संपादक