'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्राची जुवेकर यांचे ‘रणरागिणी’ विषयावर व्याख्यान

४५० हिंदूंची उपस्थिती
बजरंग दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रम

सोयगाव, जिल्हा जळगाव, ३१ मे (वार्ता.) - येथील बजरंग दलाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना ‘रणरागिणी’ या विषयावर मार्गदर्शन करायला निमंत्रित करण्यात
आले होते. जय भोले महादेव मंदिरात नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात समितीच्या सौ. प्राची जुवेकर यांनी हा विषय मांडला.
आपल्या मार्गदर्शनात महिलांवर होणारे अत्याचार, ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून मुसलमानांकडून हिंदु तरुणींचे केले जाणारे शोषण आणि त्यावर उपाय म्हणजे महिलांनी रणरागिणी बनावे याविषयी विस्तृत विवेचन सौ. जुवेकर यांनी केले. ४५० हिंदूंची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमाचा विषय आवडल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बजरंग दलाचे संयोजक श्री. योगेश मानकर, श्री. सुधीर कुळकर्णी, दलवाडा येथील बजरंग दलाचे संयोजक श्री. अनिल इंगळे यांनी पुढाकार घेतला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi