महाड, ३० एप्रिल (वार्ता.) - पतंजली योग समिती, जिल्हा रायगड मार्फत योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांचे ‘भारत स्वाभिमान’च्या अंतर्गत निःशुल्क ‘योग-विज्ञान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी महाडवासियांमध्ये सर्वत्र उत्साही वातावरण पसरले असून १ मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच योगऋषी प.पू. रामदेवबाबांचे भ्रष्टाचाराविषयी मार्गदर्शन लाभणार आहे. छत्रपती शिवरायांच्या राजधानीत त्यांचे अत्यंत उत्साहाने आणि आदरपूर्वक स्वागत करण्यास महाडकर जनता सज्ज झाली आहे.
महाडमधील नवेनगर, म्हाडा मैदान, सरकारी दवाखान्याजवळ पहाटे ५ ते ७.३० पर्यंत हे योग-विज्ञान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरानंतर सकाळी ७.४५ ला योगऋषी प.पू. रामदेवबाबा पत्रकार परिषदही घेणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क : ९२७२७०३३१२/ ९४२३०४८०५६