'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

हिंदुजागृतीची आवश्यकता !

धर्म, संस्कृती, शिक्षण, ऐक्य, दूरदृष्टी या सर्व सूत्रांच्या संदर्भात हिंदु समाजाची अधोगती झालेली दिसते. या अधोगतीची आमच्या संग्रहातील काही उदाहरणे पुढे दिली आहेत. स्वतःच्या
संस्कृतीविषयीचे अज्ञान, सहिष्णुतेचा इतर पंथियांकडून घेतला जात असलेला लाभ, हिंदूंचे कर्तव्य आणि त्यांनी करावयाच्या आवश्यक गोष्टी यांविषयी या लेखातून हिंदुजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. लेख वाचून हिंदूंनी जागृत व्हावे, ही अपेक्षा !
आतापर्यंत आपण हिंदु धर्मियांवरील आघात, धर्मांतर, महात्मा गौरीनाथ, धर्मांतराविषयी काही मान्यवरांचे विचार, तसेच भारतीय शिक्षण पद्धतीवरील प्रभाव यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

३ इ. ख्रिस्तांच्या शाळेतील अत्याचार !
३ इ १. धर्मांतर
३ इ १ अ. हिंदु विद्यार्थ्यांना त्यांच्या रीतीप्रमाणे शृंगार करण्यास प्रतिबंध करणे आणि नियम मोडणार्‍या मुलांना मारपीट करणे : अहमदाबादच्या ओढव विस्ताराच्या ख्रिस्ती मिशनरी संचालित होसन्ना
मिशनरी स्कूलच्या संचालकांनी नाम ओढणे, गळ्यातले, बांगड्या किंवा पैंजण घालणे यांस प्रतिबंध घातला आहे, तसेच काही खास प्रकारची वस्त्रे परिधान करून येण्याचा सक्त आदेश विद्यार्थ्यांना दिला; कारण त्यांना ज्ञात होते की, या गोष्टींमुळे हिंदु मुलांवरील हिंदुत्वाचे संस्कार टिकून रहातील आणि त्यांचे धर्मांतर करणे अशक्यप्राय होईल. शाळेतील अशा बेकायदेशीर आदेशांचे उल्लंघन करणार्‍या विद्यार्थ्यांना कडक शिक्षा देऊन त्यांची पिटाई केली जाते.
३ इ १ आ. हिंदु विद्यार्थीनीला ती पैंजण घालून आली म्हणून काठीने मारणारी मिशनरी शाळेतील शिक्षिका : अहमदाबादच्या शाळेत एक विद्यार्थिनी सलवार आणि पैंजण घालून तसेच कुंकू लावून शाळेत आली, तर शिक्षिकेने तिला काठीने मारले. या दुष्कृत्याला दुसर्‍या शिक्षिकेने विरोध केला असता त्या शिक्षिकेला शाळेतून त्वरित काढून टाकले. आपल्या देशात मिशनर्‍यांकडून शिक्षणाच्या नावाखाली लहान मुलांवर हिंदु संस्कृतीच्या विरोधात कुसंस्कारांचे सिंचन करून त्यांचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र शीघ्रतेने होत आहे, हे यावरून स्पष्टच दिसत आहे.
३ इ १ इ. समाजशास्त्र हा विषय असतांना बायबलच्या गोष्टी असलेला ‘नैतिक मूल्ये’ हा विषय सक्तीने ठेवणे : मुलांना ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करण्याची एक नवी चाल म्हणजे, ‘नैतिक मूल्ये’ (मॉरल सायन्स) हा विषय. या विषयाच्या अभ्यासक्रमात बायबलच्या गोष्टी किंवा ख्रिस्ती लोकांच्या अनुभूती असतात. सामान्यपणे अभ्यासक्रमात समाजशास्त्र हा विषय आहे, तर पुन्हा नैतिक मूल्ये हा विषय वेगळा घेण्याची काय
आवश्यकता होती ? तरीही हा अपरिहार्य म्हणून घ्यावाच लागतो, नाही तर बायबल वाचणे अपरिहार्य असते. 
आमच्या शाळांत नैतिक मूल्ये म्हणून गीता कुठे शिकवली जाते ? धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणारे आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे सामाजिक कार्यकर्ते अशा वेळी काय करत असतात ?
३ इ १ ई. हिंदु मुले न कळत ख्रिस्तांच्या शिकवणीकडे आकृष्ट होतील, असे मिशनरी शाळेत वातावरण निर्माण करणे : अहमदाबादच्या कॉन्व्हेंट शाळेतील एक ख्रिस्ती नसलेली शिक्षिका सांगते की, या शाळांमध्ये भिंतीवर लावलेली चित्रे आणि कलाकृतींसह सारा परिसर आणि वातावरण असे असते की, मुले कळत-नकळत भ्रमित होऊन जावीत. माझ्या स्वतःच्या मुलीचे उदाहरण घ्या. ती आरती किंवा प्रसाद घेतांनाही छातीवर क्रॉसची खूण करते. असे करण्याचे कारण विचारल्यावर ती म्हणते, ‘‘आमच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले आहे की, असे करूनच प्रसाद घ्यायचा असतो.’’
३ इ १ उ. ख्रिस्ती धर्माची शिकवण असलेली पुस्तके प्रतिमास खरेदी करण्याची पालकांना सक्ती : राजकोटच्या आय.पी. मिशन शाळेमध्ये शिकणार्‍या मुलीच्या पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, ‘मध्यम वर्गातील परिवारांनासुद्धा प्रतिमास दहा रुपयांची ख्रिस्ती धर्माची पुस्तके खरेदी करावी लागतात. माझ्या दोन मुली याच शाळेत शिकत असल्याने काही तक्रारीविना मला पुस्तके घ्यावीच लागतात. माझी मुलगी अभ्यासात अत्यंत तल्लख आहे, प्रत्येक परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकांत ती असते, तरीही आदर्श विद्यार्थ्याचे बक्षीस नेहमी एखाद्या खिस्ती मुलीलाच मिळते.’
३ इ १ ऊ. हिंदू पालकांनो, धर्म-परिवर्तनाच्या षड्यंत्रापासून सावधान ! : आई-वडील विचार करतात की, आपली मुले मिशनर्‍यांच्या शाळेत शिकल्यामुळे जीवनात पुढे जातील; परंतु त्यांना कल्पना नाही की, या शाळा धर्मांतराचे अड्डेच बनल्या आहेत. लहान मुलांच्या डोक्यात हिंदु संस्कृती, रीतीरिवाज आणि देवता यांच्या विरोधात खोट्या आणि काल्पनिक गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करून त्यांना ख्रिस्ती बनण्यास प्रेरित केले जात आहे.
आपल्याला आपल्याच देशात परकीय व्हायचे आहे का ? आपल्याला पुन्हा पारतंत्र्याच्या शृंखलेत बंदिस्त व्हायचे आहे का ? जर नाही, तर मिशनर्‍यांच्या या षड्यंत्राला एकत्रित कडाडून विरोध करा आणि अशा मिशनरी संचालित शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकायला पाठवून त्यांना अंधाराच्या दरीत ढकलून देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आणू नका.
धर्म-परिवर्तनाच्या अशा षड्यंत्रापासून सावध रहा आणि आपल्या संपर्कात येणार्‍यांनाही सावध करा. 
(क्रमशः)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi