'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘धर्मद्रोह करणारे, धर्माची विटंबना करून धर्ममूल्यांचा अनादर करणारे आणि त्याचा प्रसार सर्वत्र करणारे बुद्धीप्रामाण्यवादी’ या सर्वांच्या विरोधात धर्ममोहीम उभी करण्याचा संदेश देणारे प.पू. डॉक्टरांचे लिखाण !

डॉ. आठवले

प.पू. डॉक्टरांच्या ‘मुसलमानांचे लांगूलचालन करून ......’ या लिखाणावर ‘एक विद्वान’ यांचे भाष्य

डॉ. आठवले : मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंना देशोधडीला लावणारे अन् राष्ट्राची अपरिमित हानी करणारे सर्व राजकीय नेते, समाजसेवक, बुद्धीवादी, पुरोगामी, पत्रकार आणि दूरचित्रवाणी वाहिनीवाले यांना ईश्वरी राज्याची स्थापना झाल्यावर पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच शिक्षा योग्य होईल ! (मार्गशीर्ष शु. द्वितीया, कलियुग ५११२ (७.१२.२०१०))


१. ‘एक विद्वान’ यांचे भाष्य
१ अ. अधर्मवाद जोपासणारा पाकिस्तान देश हा ‘मृत्यूनंतर, तसेच जिवंतपणीही यातना देणार्‍या नरकासारखाच’ असणे : पाकिस्तान हा अधर्मवादी देश असल्याने येथील वातावरण जिवंतपणाही, तसेच मृत्यूनंतरही यातना देणार्‍या नरकासारखेच आहे. तेथील मूल्ये ही स्वार्थभोगवादी असल्याने ती जिवाला स्वैराचार, अनाचार, अत्याचार करण्यास शिकवणारी आहेत.
१ आ. पंथाची मूल्ये ही स्वैराचारास पुष्टी देणारी असल्यास होणारी प्रक्रिया : जसा पंथ तशी प्रकृती, जशी प्रकृती तसे वर्तन, जसे वर्तन तसे संस्कार, जसे संस्कार तशी गती. दुराचारी गतीने प्रवास करणार्‍या जिवांना पाताळात, तसेच नरकात पुढची शिक्षा भोगण्यास जावे लागते.
१ इ. कलियुगात हिंदूंची झालेली दिनवाणी आणि लांच्छनास्पद स्थिती
१ इ १. हिंदूंना कुणीही वाली नसणे : हिंदूंना सांभाळणारा, तसेच त्यांचे रक्षण करणारा कुणीही या हिंदुराष्ट्रात राहिला नाही. 
१ इ २. सज्जनांची स्थिती : जे सज्जन आहेत, ते त्यांच्या कौटुंबिक मायेत अडकले आहेत.
१ इ ३. साधकांची स्थिती : जे साधक आहेत, ते सकामात अडकले आहेत.
१ इ ४. संतांची स्थिती : जे संत आहेत, ते त्यांच्या सांप्रदायिकतेत अडकले आहेत.
१ इ ५. पोकळ धर्मवाद जोपासणार्‍यांची स्थिती : जे पोकळ, म्हणजेच तात्त्विक धर्मवाद जोपासणारे आहेत, ते केवळ कृतीने नव्हे, तर वृत्तपत्रातून वैचारिक स्तरावर लेखन करणार्‍या एखाद्या स्तंभापुरतेच मर्यादित राहिले आहेत.
१ इ ६. देवळातील पुजार्‍यांची स्थिती : देवळातील पुजारी आहेत, ते स्वतःच दक्षिणेच्या मागे लागल्याने पोटभरू तत्त्वावर एकप्रकारे लोकांना फसवतच आहेत. त्यांना धर्मद्रोह करणार्‍यांविषयी, तसेच देवतांचे विडंबन करणार्‍यांविषयी, तसेच मूर्तीभंजन करणार्‍यांविषयी, देवळात चोर्‍या करणार्‍यांविषयी चीड राहिलेली नाही.
१ इ ७. पुरोहितांची स्थिती : जे पुरोहित आहेत किंवा जातीने ब्राह्मण आहेत, त्यांना ब्राह्मण म्हणवून घेण्याचीच लाज वाटू लागली आहे. पुरोहितवर्गाची पुढची पिढी आता वैदिक धर्मालाच नावे ठेवू लागली आहे. ही पिढी विदेशात जाऊन मोठ्या प्रमाणात अभारतीय बनू पहात आहे.
१ इ ८. क्रांतीकारकांची स्थिती : ज्यांनी आपल्या राष्ट्रासाठी प्राण वेचले, ते क्रांतीकारक केवळ पुस्तकावरच राहिले आहेत आणि आता तर ते खरोखरच इतिहासजमा होऊ लागले आहेत.
१ इ ९. भारतियांची स्थिती
१ इ ९ अ. विदेशी संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण होणे : जे भारतीय आहेत, त्यांना हिंदुधर्माविषयी प्रेम वाटण्याचे सोडून विदेशी लोकांबद्दल आणि त्यांच्या संस्कृती नव्हे, तर कुसंस्कृतीविषयीच अपार श्रद्धा निर्माण होऊ लागली आहे.
१ इ ९ आ. सर्वत्र षंढपणाचे साम्राज्य येणे : गांधींनी शिकवलेल्या अहिंसक तत्त्वामुळे सर्वत्र षंढपणाचे साम्राज्य आले आहे. कुणीही हिंदूंना लुटू पहात आहे.
१ इ ९ इ. राज्यशासनाने अतिरेक्यांविषयी सौम्य भूमिका घेणे : आता सर्वत्र काश्मिरसारखी परिस्थिती येऊ लागली आहे. अतिरेकी भारतात शिरून अनेक ठिकाणी त्यांचे गुप्ततळ ठोकत असतांना राजकारणी आणि पोलीस मुसलमानांना घाबरून त्यांचे लांगूलचालन करून सत्य दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
१ इ ९ ई. दुर्जनांनी सर्वत्र थैमान घालण्यास प्रारंभ करणे : दुर्जनांनी तर सर्वत्रच भ्रष्टाचार, बलात्कार, हिंसाचार, तसेच अत्याचार यांच्या माध्यमातून थैमान घालायला प्रारंभ केला आहे. हिंदुधर्माला वाचा फोडणारे, त्यातील नैतिक मूल्यांचा प्रसार करून समाजाला धर्मशिक्षण देणारे कुणीही उरलेले नाही.
१ इ ९ उ. सत्याची कास धरणारा कुणीही न उरणे : असत्याची वाट धरणारे पुष्कळजण आहेत; परंतु सत्याची कास धरणारा एकही जीव आज नावालाही शिल्लक राहिलेला नाही.
१ इ ९ ऊ. तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने होणारी शीघ्र वाटचाल ! : धर्मद्रोह, राष्ट्रद्रोह, समाजद्रोह अशा सारख्या अनैतिक प्रक्रियांचे सर्वत्र पेवच फुटल्याने भारत देश आता महाभयंकर असणार्‍या तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने शीघ्र गतीने जात आहे. 
१ ई. आपत्कालात स्वतःला वाचवायचे असेल, तर तीव्र साधना करणे आवश्यक असणे आणि यातील सूत्रे
१ ई १. समष्टी साधना केली पाहिजे ! : या प्रलयंकारी काळात वाचायचे असेल, तर धर्मनिष्ठ राहून काळाची कृपा संपादन करण्यासाठी समष्टी साधनेची कास धरली पाहिजे.
१ ई २. समष्टी साधनेने वायूमंडलावर अधिपत्य गाजवता येणे : समष्टी साधनेच्या जोरावर काळाचे मन जिंकता येते, म्हणजेच स्वतःच्या पिंडात देवत्व तर आणता येतेच, शिवाय वायूमंडलावरही अधिपत्य गाजवता येते.
१ ई ३. व्यष्टी साधनेची मर्यादा ! : व्यष्टी साधना केली असता केवळ देवत्वच अंगी बाणवता येते. यात केवळ वैयक्तिक स्तरावर पिंडाची साथ मिळण्यास साहाय्य मिळते.
१ ई ४. सहाव्या आणि सातव्या पाताळाचे साहाय्य मिळणार्‍या धर्मभ्रष्ट जिवांना वेळीच हटवणे आवश्यक असणे : धर्मभ्रष्ट जिवांना वेळीच हटवणे आता अनिवार्य बनले आहे, नाहीतर हे जीव संपूर्ण भारतदेशातील धर्ममूल्यांनाच गिळंकृत करण्यास मागेपुढे पहाणार नाहीत; कारण यांना सहाव्या आणि सातव्या पाताळातील बलाढ्य असुरांचे साहाय्य लाभलेले आहे.

२ उ. निष्कर्ष
१ उ १. येणार्‍या आपत्कालात आवश्यक असणारे धर्मसंदेशरूपी सूत्र !
या बलाढ्य असुरांना काळच हरवू शकतो आणि त्यासाठी आता सर्वत्रच्या धर्मयोद्ध्यांना धर्मसिद्ध होऊन धर्महक्कांच्या बळावर सांघिकतेने लढा देऊन श्रीकृष्णाच्या कृपेच्या जोरावर मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंना देशोधडीला लावणार्‍या अन् राष्ट्राची अपरिमित हानी करणार्‍या सर्व धर्मद्रोह्यांना पाकिस्तानात, म्हणजेच
एक प्रकारच्या भयंकर यातना देणार्‍या नरकात पाठवायचे आहे. तरच हा भारत देश खर्‍या अर्थाने पारतंत्र्यातून मुक्त होऊन ईश्वरी राज्याची स्थापना होईल ! 
१ उ २. प.पू. डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या रूपात साधकांना एकप्रकारे काळानेच संदेश देणे : प.पू. डॉक्टरांनी ‘धर्मद्रोह करणारे, धर्माची विटंबना करून धर्ममूल्यांचा अनादर करणारे, तसेच धर्मनीतीला मिथ्या ठरवून आधुनिकवादाचा पुरस्कार करून त्याचा प्रसार सर्वत्र करण्यासाठी धडपडणारे बुद्धीप्रामाण्यवादी’ या सर्वांच्या विरोधात धर्ममोहीम उभी करून त्याद्वारे त्यांना चांगलाच धडा शिकवण्याचे मार्गदर्शन वरील परिच्छेदाद्वारे केले आहे.
त्याला ईश्वरी आज्ञा समजून आता साधकांनी धर्मक्रांती करण्यास सिद्ध व्हायचे आहे आणि हा एकप्रकारे काळाने दिलेला पूर्वसूचनारूपी संदेशच आहे !
(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ शु. ८, कलियुग वर्ष ५११२ (११.२.२०११), सायं. ५.५६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi