'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

अयोध्येतील वादग्रस्त भूखंडावर श्रीराममंदिर आणि मशीद बांधण्याचा महंत ज्ञानदास यांचा प्रस्ताव !

मुसलमानांची जिहादी मानसिकता समजू न शकलेले हिंदु महंत !

अयोध्या, ३० एप्रिल (वृत्तसंस्था) - अयोध्या वादावर न्यायालयाच्या बाहेर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात हनुमान गढी मंदिराचे मुख्य पुजारी महंत ज्ञानदास आणि या प्रकरणी याचिका दाखल केलेले एक प्रमुख
याचिकादार हाशिम अन्सारी यांनी वादग्रस्त भूखंडावर श्रीराममंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. या दोघांनी सिद्ध केलेल्या प्रस्तावानुसार मंदिर आणि मशीद यांच्यामध्ये शंभर फुटांची भिंत असेल. (अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी आहे. त्यामुळे तेथे श्रीरामाचेच मंदिर व्हायला हवे. मंदिराच्या नजीक मशीद बांधण्याला अनुमती देणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखेच आहे. मुसलमान त्यांच्या पवित्र जागेवर कधीतरी मंदिर बांधू देतील का ? - संपादक) महंत ज्ञानदास यांनी पुढे सांगितले की, गुजरात राज्याची राजधानी कर्णावती येथे १५ मे या दिवशी बैठक होत आहे. या ठिकाणी या प्रकरणातील मुख्य पक्षकार निर्मोही आखाड्यासह १८ आखाडे भाग घेत आहेत. या सर्वच आखाड्यांना हा प्रस्ताव मान्य आहे. तसेच हा प्रस्ताव सर्वच प्रमुख हिंदु धर्मगुरूंनाही मान्य आहे. या चर्चेत विश्व हिंदु परिषद आणि भारतीय जनता पक्ष यांना सहभागी करून घेण्यात आलेले नव्हते. हे दोन्ही अयोध्येत श्रीराममंदिर बनवू इच्छित नाहीत. ते केवळ धार्मिक तणाव वाढवून मतांचे राजकारण करू पहात आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi