'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

वैमानिकांच्या बेमुदत संपामुळे एअर इंडियाची १३० उड्डाणे रहित

दीड सहस्त्र वैमानिक संपावर

मुंबई, ३० एप्रिल - एअर इंडिया आस्थापनातील वैमानिकांनी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये सहभागी झालेल्या वैमानिकांची संख्या आता सलग चौथ्या दिवशी दीड सहस्त्र इतकी वाढली असून त्यामुळे आज दिवसभरात
एअर इंडियाची एकूण ६० विमान उड्डाणे रहित झाली आहेत. यांतील ३७ विमान उड्डाणे ही देशांतर्गत आणि २५ उड्डाणे ही विदेशात जाणारी होती. या संपामुळे मागील चार दिवस कंपनीला २६ कोटी रुपयांची आर्थिक हानी झाली. त्यामुळे कंपनीने आता प्रवाशांचे नव्याने आरक्षण करणे थांबवले आहे. (संपकाळात उत्पादन थांबते, त्यामुळे मनुष्यबळ वाया जाते. परिणामी संबंधित आस्थापनाचे पर्यायाने देशाची आर्थिक हानी होते. आधीच देशावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असतांना संप करून देशाला कर्जाच्या खाईत लोटणारे वैमानिक राष्ट्रद्रोही होत ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi