बेंगळुरू, ३० एप्रिल (वृत्तसंस्था) - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर तावांग परिसरातून उड्डाणानंतर काही क्षणातच भरकटले होते. तीन तास या हेलिकॉप्टरचा काहीच ठावठिकाणा लागत
नव्हता. हे हेलिकॉप्टर तीन तासांनी तावांगनजीकच भूतानच्या हद्दीत आपत्कालिन स्थितीत उतरले. खांडू यांच्यासह हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार्या सर्व पाच व्यक्ती सुरक्षित आहेत. (पवनहंस या आस्थापनाची हेलिकॉप्टर तावांग परिसरातूनच भरकटण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्या घटनेत तर हेलिकॉप्टरमधील २३ प्रवासी ठार झाले होते. तसेच या ठिकाणी सैन्याचे एक हेलिकॉप्टर कोसळून चार सैनिक ठार झाले आहेत. उडत्या शवपेट्या ठरलेल्या मिग-२१ या विमानांप्रमाणेच ही हेलिकॉप्टरही उडत्या शवपेट्या ठरत नाहीत ना ? - संपादक)