'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘दैनिक सनातन प्रभात’चा वर्धापनदिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस !


श्री. शिवाजी वटकर
‘दैनिक सनातन प्रभात’ हा हिंदूंच्या दुःखमय जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. सनातन प्रभातमुळे हिंदूंना विश्वातील घडामोडीचे ज्ञान होते आणि ते धर्माचरण करून कृतीशील होत आहेत. त्यातून ते अत्यंत आनंदी जीवन जगत आहेत. लक्षावधी जिवांसाठी ‘दैनिक सनातन प्रभात’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा या दैनिकाचा वर्धापनदिन रविवार, २२ मे २०११ या दिवशी होणार आहे. त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या अंकासाठी जाहिराती मिळवणे, सोहळ्याचा प्रसार करणे ही साधक, वाचक आणि हितचिंतक यांना सेवेसाठी सुवर्ण संधी आहे. 

संकलक : श्री. शिवाजी वटकर, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, मुंबई, ठाणे आणि रायगड


सनातन प्रभात : एक दशक अविरतपणे तळपत असलेला सूर्य !
एखादे वर्तमानपत्र चालू होते, ते किती दिवस चालते आणि त्याचा फायदा कोणाला होतो, हे सध्याच्या भ्रष्ट आणि अनागोंदी राज्यकारभारावरून सर्वांच्या लक्षात येते. एखादे नियतकालिक हे केवळ राजकारणी, अमाप पैसेवाले किंवा खिस्ती मिशनर्‍यांकडून अब्जावधी रुपयांचे साहाय्य मिळवणारे, व्यापारी आणि खिसेभरू लोकच चालवू शकतात. मोठमोठे हिंदुत्ववादी पक्ष, संघटना आणि संप्रदाय यांनाही दैनिक चालवणे कठीण जात आहे; म्हणूनच दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे, जे फक्त सर्वसाधारण लोकांनी, लोकांकरता चालवलेले आदर्श वृत्तपत्र आहे. त्याला ईश्वरी पाठबळ आणि संतांचे आशीर्वाद असल्यामुळेच हे वृत्तपत्र गेली १० वर्षे एकही दिवस सुटी न घेता अविरतपणे सूर्यासारखे तळपत आहे. 
हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेत सिंहाचा वाटा असणारे दैनिक ‘सनातन प्रभात’
सध्या वृत्तपत्रे बरीच असली, तरी छापील आणि संग्रही ठेवण्यासारखे वृत्तपत्र म्हणजे ‘दैनिक सनातन प्रभात’ ! आपले हित जपणारा मित्र किंवा गुरु यांच्या मार्गदर्शनाची आपल्याला पावलोपावली गरज भासते; म्हणून ‘दैनिक सनातन प्रभात’ हा श्रीकृष्णासारखा सखा आहे, तर संस्थापक प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा दररोजचा संदेशरूपी सत्संग आहे. व्यष्टी साधनेसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी ‘दैनिक सनातन प्रभात’ची मोलाची मदत होत आहे, तसेच समष्टी साधना करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या प्रत्येक मोहिमेसाठी आणि उपक्रमासाठी ‘दैनिक सनातन प्रभात’चा सिंहाचा वाटा आहे.
दैनिकाचा वर्धापनदिन सोहळा !
अशा या दैनिक ‘सनातन प्रभात’चा ११ वा वर्धापनदिन देवद, पनवेल जिल्हा रायगड येथील आश्रमात (वैशाख कृ. ५) रविवार, दिनांक २२ मे २०११ या दिवशी संपन्न होत आहे, ही एक आपल्यासाठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. या सोहळ्यासाठी वाचक, राष्ट्रप्रेमी, हिंदु धर्मप्रेमी, संप्रदाय, हिंदुत्त्ववादी पक्ष अन् संघटना यांना सक्रीयपणे सहभागी करवून गुरुऋणातून उतराई होणे, कृतज्ञता व्यक्त करणे यासाठी ही सुवर्ण संधी आहे; म्हणून आपण तन, मन अन् धन यांचा त्याग करून ‘दैनिक सनातन प्रभात’च्या वर्धापन सोहळ्यात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणीत करू या !
विज्ञापने देऊन आर्थिक हातभार लावा !
ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी चालवलेले ‘दैनिक सनातन प्रभात’ हे धर्मजागृती, हिंदुसंघटन आणि राष्ट्ररक्षण यांसाठी साधकांनी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव दैनिक आहे. वार्ताहर, संपादक, वितरक इत्यादी निरपेक्ष भावाने वर्षानुवर्षे दैनिकाची सेवा करून श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांचा संदेश प्रतीदिन आपल्या दारी पोहोचवत आहेत. त्याचा स्थूलातून, तसेच सूक्ष्मातून सर्वांना लाभ होत आहे. ‘दैनिक सनातन प्रभात’ गुटखा, चित्रपट, दारू इत्यादींच्या जाहिराती छापत नाही, तसेच शासनही जाहिराती देत नाही; म्हणून आपण सर्वांनी अधिकाधिक जाहिराती मिळवून या वर्धापनदिनाच्या विशेषांकासाठी आर्थिक हातभार लावणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे.
वर्धापनदिन सोहळ्याचे व्यापक स्वरूप !
देवद आश्रम येथे रविवार, २२ मे २०११ या दिवशी सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत वर्धापनदिन सोहळा संपन्न होत आहे. यामध्ये श्लोकपठण, दीपप्रज्वलन, विशेषांकाचे प्रकाशन, मान्यवर, विज्ञापनदाते आणि वितरक यांचा सत्कार, संपादकाचे मनोगत, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन असा कार्यक्रम असणार आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत राष्ट्र, धर्म, अध्यात्मशास्त्र यांविषयी अनमोल माहिती देणारे भव्य प्रदर्शन लावण्यात येणार आहे. रज-तमाचे प्राबल्य असणार्‍या सध्याच्या आपत्काळात चैतन्यमय, सात्त्विक आणि आनंद देणार्‍या सनातन आश्रमाचे दर्शनही धर्मप्रेमींना होणार आहे. राष्ट्र, धर्म, आध्यात्मिक संशोधन इत्यादी विषयी ध्वनीचित्र तबकड्या दाखवण्याचे आयोजनही करण्यात आले आहे. अधिकाधिक राष्ट्र आणि धर्म प्रेमींनी याचा लाभ घेण्याचा हा दिवस आहे. प्रत्येकालाच या सोहळ्याचा लाभ घेता यावा यासाठी दिवसभर हा वर्धापनदिनाचा कार्यक्रम चालू ठेवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने निमंत्रणपत्रिका देणे, अधिकाधिक लोकांचा सहभाग होण्यासाठी साधना म्हणून प्रचारप्रसार करणे, भित्तीपत्रके लावणे, फलक लिहिणे, फ्लेक्स (होर्डिंग) लावणे, घरोघरी प्रसार करणे, वर्गणीदार वृद्धी करणे, प्रसारफेरी काढणे, वाहनातून उद्घोषणा करणे, स्थानिक केबलवरून जाहिरात करणे इत्यादी सेवांचे नियोजन करण्यात आले आहे. 
सध्याच्या आपत्काळात शासन, राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही आणि सुक्ष्मातील असूरी शक्ती दैनिक ‘सनातन प्रभात’वर बंदी आणून हिंदूंची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहेत; म्हणून सर्व हिंदूप्रेमींनी या दैनिकाची ज्योत मालवू न देता ती अधिक प्रज्वलित करण्यासाठी कटिबद्ध व्हायचे आहे. गेली ११ वर्षे अवितरपणे हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या आणि हिंदूंमध्ये धर्मज्योत तेवत ठेवणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा हा हिंदूंसाठी आनंदोत्सव आहे. या आनंदोत्सवात सहभागी होऊन श्रीकृष्णाची कृपा संपादन करूया ! 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi