'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

राजकारण्यांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ धोरणाला हिंदूंनी बळी पडू नये ! - पू. गुड्डाली स्वामीजी

कर्नाटकमधील राणेबेन्नुरू येथे हिंदु धर्मजागृती सभा

राणेबेन्नुरू (कर्नाटक), ३१ मार्च (वृत्तसंस्था) - ‘‘भारतावर अनेकांनी आक्रमण केले; मात्र तरीही भारतीय संस्कृती टिकून राहिली. भारतीय संस्कृतीचा कणा असलेला धर्म ते नष्ट करू शकले नाही.
आज सगळीकडे पाश्चात्त्यीकरणाचे वारे वहात आहेत; मात्र ते सगळे तात्पुरते आहे. लवकरच आपण त्यामधून बाहेर पडू. राजकारणी मतांसाठी घाणेरेडे खेळ खेळत आहेत. त्यांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला आपण बळी पडता कामा नये’, असे उद्गार पू. गुड्डाली स्वामीजी यांनी धर्मजागृती सभेत बोलतांना काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकच्या हवेरी जिल्ह्यातील राणेबेन्नुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी पू. गुड्डाली स्वामीजी, सनातन संस्थेच्या कु. स्फूर्ती बेनाकनवारी आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर व्यासपिठावर उपस्थित होत्या. सभेला सुमारे २०० धर्माभिमानी उपस्थित होते. स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘ज्यांनी या पुण्यभूमीच्या रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला, त्या शूरविरांना, स्वातंत्र्यसैनिकांना आणि राजा-महाराजांना आम्ही विसरता कामा नये. हिंदूंना संघटित होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही.’’ सनातन संस्थेच्या कु. स्फूर्ती बेनाकनवारी यांनी हिंदु धर्माचे महत्त्व विषद केले. ‘मंदिर सरकारीकरण कायदा, देवता आणि धर्म यांची विटंबना यांना आपण हिंदूंनी संघटितपणे विरोध केला पाहिजे’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर यांनी वेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मलतेश गडद आणि कुमारी भाग्या यांनी केले. ‘वन्दे मातरम्’ ने सभेची सांगता झाला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi