नवी दिल्ली - अलीकडेच झालेल्या भारताच्या १५ व्या जनगणनेचे प्राथमिक आकडे सार्वजनिक करण्यात आले आहेत. या आकड्यांनुसार भारताची लोकसंख्या १ अब्ज २१ कोटींवर पोहोचली आहे.
सर्वाधिक लोकसंख्या उत्तरप्रदेशची आहे, तर महाराष्ट्र या क्रमवारीत दुसर्या स्थानावर आहे. गेल्या दहा वर्षांत भारताच्या लोकसंख्येत १८ कोटींची भर पडली आहे. लोकसंख्येत जगात दुसर्या स्थानावर असलेल्या भारताची लोकसंख्या जगाच्या तुलनेत १७.६ टक्के इतकी आहे, तर पहिल्या स्थानावर असलेल्या चीनची लोकसंख्या १९.४ टक्के इतकी आहे. भारताच्या साक्षरतेचे प्रमाण ७४ टक्के गेल्या दहा वर्षांत भारताच्या साक्षरतेचे प्रमाण ९. २१ टक्क्यांनी वाढून ते ७४ टक्के झाले आहे. २०११ मधील जनगणनेची आकडेवारी आज जाहीर झाली. २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरतेचे प्रमाण ६४. ८३ होते. साक्षरतेचे ९३. ९१ टक्के प्रमाण गाठून केरळ देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे, तर बिहार साक्षरतेच्या विषयी सर्वांत खालचे राज्य ठरले आहे. बिहारचे साक्षरतेचे प्रमाण ६३.८२ टक्के आहे. देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी झाले आहे. १ सहस्त्र पुरुषांच्या मागे ९४० महिला असे प्रमाण आढळले आहे.