'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीच्या माध्यमातून खेचल्या जाणार्‍या प्रजापति लहरींच्या संदर्भात मिळालेले ज्ञान

हिंदु धर्म आणि संस्कृती किती महान आहे, हे पुढील ज्ञानावरून लक्षात येईल. त्यात धर्मशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या कृतीचा उपयोग किती व्यापक असतो, हेही कळेल. चैत्र शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (४.४.२०११) या दिवशी गुढीपाडवा आहे. हिंदु संस्कृतीत गुढी उभारण्याची कृती ही नुसती वर्षारंभ किंवा विजयाचे प्रतीक म्हणून नाही, तर त्याचे अनेक सूक्ष्म स्तरावरील लाभ आहेत. गुढी उभारल्याने प्रजापति लहरी आकृष्ट होतात आणि त्यांचा लाभ होतो. तो लाभ नुसता चैतन्याच्या स्तरावरच मर्यादित नाही, तर त्यामुळे  प्रजोत्पादनाचा दर्जा वाढून उत्तम प्रजेची निर्मिती होते, हे आपल्याला कळेल. त्यामुळे हिंदूंनी धर्मशास्त्रावर श्रद्धा ठेवून नुसती जरी कृती केली, तरी त्यांना लाभ होईल आणि जर त्यांनी भक्तीभावाने ती कृती केली, तर त्यांना १०० पटींनी लाभ होईल. पुढील ज्ञान आपल्याला हेच सांगते. ज्ञान हे अनंत आहे. हिंदु धर्माची महती आपल्याला ज्ञानातून होते. त्याचे नवनवीन पैलू शिकायला मिळतात. सनातनच्या साधकांना ईश्वर हे ज्ञान अक्षरशहा भरभरून देत आहे. अनेक साधकांच्या माध्यमातून ईश्वर हे ज्ञान देत आहे. सातार्‍याच्या वैद्या (सौ.) गौरी दत्तात्रेय याळगी यांना प्रथमच मिळालेले ज्ञान आणि त्याची प्रत आपल्याला अचंबित करेल आणि हा ईश्वराचा न संपणारा ओघ आहे, हे लक्षात येईल.


१. प्रजापति लहरींचा लाभ तरुणांना पुनरुत्पादनासाठी होत असणे : ‘गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीच्या माध्यमातून खेचल्या जाणार्‍या आणि प्रक्षेपित होणार्‍या प्रजापति लहरींचा लाभ तरुणांना पुनरुत्पादनासाठी होतो. जसे कोवळ्या कणसाला किंवा एखाद्या फळाला (ज्याच्या माध्यमातून पुढे नवीन रोप किंवा वृक्ष निर्माण होणार आहे.) आवश्यक असणारा सूर्यप्रकाश, पाणी इत्यादी अत्यावश्यक नैसर्गिक शक्ती मिळाली नाही, तर ते योग्य प्रकारे वाढत नाही. त्याची वाढ खुंटते. ते योग्य प्रकारे परिपक्व होत नाही आणि असे खुरटलेले फळ वा कणीस नवीन उत्पादन करू शकत नाही किंवा केल्यास त्याची प्रत चांगली नसते. अगदी तसेच प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला अवकाशातून येणार्‍या प्रजापति लहरी या तरुणांना पुनरुत्पादनासाठी आध्यात्मिक तत्त्वाची शक्ती देणार्‍या असून त्या ग्रहण केल्यावरच विद्युतघट (बॅटरी) प्रभारित (चार्ज) केल्याप्रमाणेच त्यांची नवनिर्माणाची क्षमता आणि प्रत (क्वॉलिटी) चांगली रहाते.
 
२. प्रजापति लहरी लोकांना मिळण्याचे प्रमाण न्यून असण्याची कारणे : हल्ली बर्‍याच जणांना गुढी उभारण्याचे महत्त्व पटूनही लाज वाटत असल्याने ते गुढी उभारत नाहीत. काही जण गुढी उभारतात; पण ती शास्त्रोक्त पद्धतीने नसते किंवा योग्य वेळेत (मुहूर्तावर) उभारली जात नाही. जे योग्य वेळेत आणि शास्त्रोक्त गुढी उभारतात, ते भावपूर्ण कृती (गांभीर्य लक्षात घेऊन आणि मनापासून) वा आर्ततेने प्रार्थना करत नाहीत. त्यामुळे गुढीत खेचल्या जाणार्‍या प्रजापति लहरी त्यांना मिळण्याचे प्रमाण न्यून असते.
 
३. प्रजापति लहरी लोकांना न मिळण्यामागील मांत्रिकांचा हेतू : यामागे सहाव्या आणि सातव्या पाताळातील मांत्रिकांचा हेतू हिंदूंच्या पुढच्या पिढ्यांची वाढ हळूहळू थांबवणे, त्यांची संख्या न्यून करणे, त्यातही कुणी निर्माण झालेच, तर त्यांची प्रत बिघडवणे, अशक्त आणि नपुंसक पिढी निर्माण करणे अन् पर्यायाने हिंदूंचा धर्मावरील विश्वास न्यून करून त्या माध्यमातून धर्माचा र्‍हास करणे आणि आसुरी राज्य निर्माण करणे, हा आहे.
 
४. इतर
अ. मूल जन्माला येण्यासाठी वरील सूत्रांपैकी शारीरिक क्षमतेचे प्रमाण न्यूनतम ५० टक्के असावे लागते.
 
आ. १०० टक्के ईश्वरी इच्छा असल्याविना जीव जन्म घेत नाही.
 
इ. मातृ-पितृत्वाची आंतरिक इच्छा ही पूर्वकर्मामुळे पुढे जसे फळ मिळणार असेल, त्याप्रमाणे होते, म्हणजे जर प्रारब्धात अपत्य असेल, तरच ते होते अथवा इच्छाच होत नाही.
 
ई. आई-वडिलांना प्रारब्धानुसारच अपत्यप्राप्ती होते. जन्मास येणार्‍या जिवाला मात्र ईश्वराने स्वतःचे आई-वडील निवडण्याची मुभा १ टक्का दिलेली आहे.’
- वैद्या (सौ.) गौरी दत्तात्रेय याळगी (सातारा) यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, फाल्गुन कृ. पंचमी/षष्ठी, कलियुग वर्ष ५११२ (२४.३.२०११)
 
ई. आई-वडिलांना प्रारब्धानुसारच अपत्यप्राप्ती होते. जन्मास येणार्‍या जिवाला मात्र ईश्वराने स्वतःचे आई-वडील निवडण्याची मुभा १ टक्का दिलेली आहे.’ (हे सूत्र योग्य आहे का ?)
उत्तर : मुभा १० टक्के दिलेली आहे.

५. समाजातील लोकांच्या विविध कृती आणि त्यामुळे प्रजापति लहरींचा होणारा परिणाम


* असे क्षुद्र्रवृत्तीचे जीव गुढी उभारण्यासारख्या सात्त्विक धार्मिक कृती करतच नाहीत; कारण पाताळातील मांत्रिक त्यांच्याकडून तशा कृती होऊ देत नाहीत.
** धर्माची, देवाची, धार्मिक कृतींची किंवा नुसता त्यांचा उच्चार करण्याचीही लाज वाटणार्‍यांवर ईश्वर कृपा करत नाही.

६. पुनरुत्पादनामध्ये असणार्‍या वेगवेगळ्या घटकांचे प्रमाण


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi