
* ‘पुढे’ म्हणजे शरिराच्या पुढच्या, म्हणजे मुखाकडच्या भागाकडील चक्राशी संबंधित भाग.
**‘पाठी’ म्हणजे शरिराच्या पाठच्या, म्हणजे डोक्याच्या भागाकडील चक्राशी संबंधित भाग
२. जप (जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकता भासल्यास करावयाचा बीजमंत्र) : मं मं शं शं (दोन वेळा ‘मं’ आणि दोन वेळा ‘शं’). २ अ. जप करतांना त्रास झाल्यास करावयाचा उपाय : हा बीजमंत्र म्हणतांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास किंवा प्रकटीकरण होत असल्यास ‘किती वेळ जप केल्यावर आपल्याला त्रास होतो’, हे पहावे आणि नंतर त्याआधीच ५ - १० मिनिटे बीजमंत्राऐवजी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करावा. त्रास न्यून झाल्यावर परत बीजमंत्राचा जप त्रास होईपर्यंत करावा. तेव्हाही त्रास व्हायला प्रारंभ झाला की, परत श्रीकृष्णाचा जप करावा. बीजमंत्राचा जप करण्याची आपली क्षमता वाढते का, हे अधूनमधून बघावे. कोणताही नामजप असल्यास नेहमीसाठीच हे धोरण लक्षात ठेवावे. ३. मुद्रा (जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकता भासल्यास करावयाची मुद्रा) : मधल्या बोटाचे टोक हाताच्या तळव्याला लावणे ४. न्यास ४ अ. शारीरिक त्रास : शारीरिक त्रास अधिक असलेल्या शरिराच्या भागाशी संबंधित चक्रावर न्यास करणे ४ आ. मानसिक त्रास : अंगठा, तर्जनी (अंगठ्याच्या बाजूचे टोक) आणि मधले बोट यांची टोके जोडून आज्ञाचक्रावर न्यास करणे ५. ८ व्या आणि ९ व्या द्वाराचे उपाय : प.पू. डॉक्टरांच्या हस्तलिखिताच्या ऐवजी त्यांनी लिहिलेला ‘आकाश’ हा शब्द द्वारांवर ठेवावा. या शब्दाच्या प्रतींसाठी जिल्हासेवकांशी संपर्क साधावा किंवा पुढील शब्दांच्या छायाप्रती (झेरॉक्स) काढून त्या वापराव्यात. पट्टीवर एक शब्द असला तरी पुरेसा आहे.
८ व्या आणि ९ व्या द्वारांचे उपाय चालू ठेवावेत.
- डॉ. आठवले (आश्विन शु. १३, कलियुग वर्ष ५११३)